पाणीपुरी शौकिनांनो पाणीपुरीचे ‘हे’ फायदे माहिती आहेत का…

0
396

पाणीपुरी म्हंटल तर भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी सुटते. पाणीपुरी हा शब्दच एखाद्याच मूड बदलायला भरपूर आहे. पाणीपुरी प्रत्येक शहराच्या नाक्यानाक्यावर पाहायला मिळते. जस लोकांना सिगारेट, दारूचं व्यसन असत तसेच मुलींना पाणीपुरीच व्यसन असत असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही.. काही लोकांना पाणीपुरी आवडत नाही कारण, त्यांना वाटत कि हि हेल्थी नसते. पण पाणीपुरी प्रेमी याला अंधश्रद्धा म्हणतात. ज्यांना पाणीपुरी आवडत नाही त्यांनी हा लेख एकदा वाचाच. म्हणजे पाणीपुरी खाण्याचे हे फायदे तुम्हाला सुद्धा कळतील..

‘पाणीपुरीचा’ इतिहास

असं म्हणतात कि, ‘एकदा शाहजहांच्या कारकिर्दीमध्ये दिल्ली आणि युपीमध्ये कोलेराची साथ पसरली होती. हा एक आजार गलिच्छ पाणी पिण्यामुळे पसरत असल्याने नंतर स्वच्छतेकडे विशेष काळजी घेण्यास सांगण्यात आले आणि सर्वांना पाणी उकळवून पिण्याचा सल्ला देण्यात आला. पण उकळलेले पाणी अतिशय बेचव लागत असल्याने चव देण्यासाठी त्या पाण्यात मसाले टाकले गेले ते पाणी गोड घालून, आंबट वगैरे करून पिण्यायोग्य बनले. आणि पानिपुरीचा जन्म इथूनच झाला. अस हि म्हणतात कि, ‘जर तुम्ही पाण्यामध्ये विविध प्रकारचे मसाले टाकून ते पाणी प्याल तर शरीरातील सर्व जीवाणू मरतात. यामुळेच लोक हिंग आणि धणे पाण्यात घालायला लागले. आता ते पाणी नुसते पिण्याऐवजी पुरीमध्ये भरण्यास सुरूवात करून ते प्यायला लागले.’ आणि येथूनच आपल्या चटपटीत ‘पाणीपुरीचा’ जन्म झाला.

 

  • पाणीपुरी खाण्याचे फायदे

१. वजन कमी करणे- 
हो जर आपल्याला वजन कमी करायचे तर पाणीपुरी खाण्याचा फायदा होतो, जे मसाले या पाण्यात घातले जातात ते मसाले आपली पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात.

२. मळमळणे –
कधी आपण जास्त प्रवास केला, झोप नसेल झाली, तर कधी विनाकारण, मळमळ जाणवते, अशावेळी पाणीपुरीची चव जिभेला उत्तम ठरते.

३. तोंड येणे –
आपण पाणीपुरीचे पाणी तयार करताना शक्यतो घरगुती आंबट आणि तिखट मसाल्यांचा वापर करतो. त्यामुळे हे घरगुती असल्या कारणाने हे मसाले तोंड आले तर त्यावर रामबाण उपाय ठरतात.

४. ऍसिडिटी –
पाणीपुरीचे पाणी बनवण्यासाठी आपण त्यामध्ये वाटलेले जिरे, काळे मीठ आणि पुदिन्याचा वापर करतो त्यामुळे हे पाणी तुमचे पोट शांत ठेवण्यास मदत करते. आणि ऍसिडिटीचा त्रास होत नाही.

पाणीपुरीमध्ये आपण घरगुती आयुर्वेदिक घटक असलेले मसाले घातलेले असतात, त्यामुळे पाणीपुरी ही दुपारच्या वेळी खावी. म्हणजे दुपारच्या आणि संध्याकाळच्या जेवना च्या मध्ये जो वेळ असतो त्यावेळी. कारण यामुळे, खाल्लेले अन्न हे चांगल्या प्रकारे पचते.