पवनानगरमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल

0
502

लोणावळा, दि. ६ (पीसीबी) – पवनानगर येथे हवेत गोळीबार करत एकावर  बंदूक रोखून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी संदीप बाबुलाल भुतडा (वय ४३  रा. पवनानगर ता.मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. भुतडा यांच्या फिर्यादीवरुन खंडू अशोक कालेकर, अनिकेत अशोक कालेकर व अभिषेक काशिनाथ साबळे (सर्व रा. पवनानगर ता. मावळ जि. पुणे) यांच्यावर भादवी कलम ३०७, ३८४, ३८५, ३४ व आर्म ॲक्ट ३ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कालेकर यांनी संगनमत करुन पवनानगर येथील जितेश ओमप्रकाश केला याचेकडे तीन हजार रुपये बळजबरीने मागितले. याबाबत भुतडा यांनी विचारणा केली असता अनिकेत अशोक कालेकर तसेच खंडू अशोक कालेकर याने त्याच्या हातातील पिस्तुल दाखवत तुझी विकेटच काढतो, असे म्हणून हवेत एक गोळी फायर करून दुसरी गोळी भुतडा यांच्या दिशेने फायर करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे तपास करत आहेत.