पिंपरीत सख्ख्या बहिणींचा विनयभंग

0
746

पिंपरी, दि. ६ (पीसीबी)  –  अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून माझे तुझ्यावर प्रेम आहे, तु माझ्यावर प्रेम कर’, असे म्हणून तिचा एका तरूणाने विनयभंग केला. तिने आरडा-ओरडा केल्यानंतर तिची बहिण आली असता आरोपीने तिचाही हात पकडून विनयभंग केला. ही घटना पिंपरी येथे घडली.

राहूल अशोक वाघमारे (वय २२, रा. लालटोपीनगर, मोरवाडी, पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल हा फिर्यादी मुलीचा वारंवार पाठलाग करत होता. शनिवारी दुपारी साडेतीन वाजता राहुलने फिर्यादी मुलीचा पाठलाग करून तिचा हात पकडला. माझे तुझ्यावर प्रेम आहे, तु माझ्यावर प्रेम कर, असे म्हणून तिचा विनयभंग केला. तसेच तिने आरडा-ओरडा केल्यानंतर तिची बहिण आली असता राहुलने तिचाही हात पकडून विनयभंग केला. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.