पाकव्याप्त काश्मीरसाठी आम्ही जीव द्यायला तयार – अमित शहा

0
432

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – पाकव्याप्त काश्मीर भारताचे अविभाज्य अंग असून त्यासाठी आम्ही जीव द्यायलाही तयार आहे,  अशा शब्दांत गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानचे नांव न घेता खडसावून सांगितले.  जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचे विधेयक राज्यसभेत बहुमताने मंजुर करण्यात आले. त्यानंतर आज (मंगळवार) हे विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले. यावरील चर्चेत शहा बोलत होते.   

आज लोकसभेतील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते अधीर रंजन यांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्यावर अमित शहा यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले. मी ज्यावेळी जम्मू काश्मीरबाबत बोलेतोय, त्यावेळी त्यात पाकव्याप्त काश्मीरचाही समावेश आहे. आम्ही जम्मू काश्मीरसाठी जीव द्यायलाही तयार आहोत, असे  शहा  म्हणआले.

१९४८ पासून जम्मू काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्राच्या देखरेखीखाली आहे. मग हा मुद्दा अंतर्गत कसा झाला? असा सवाल काँग्रेस नेते अधीर रंजन यांनी उपस्थित केला. यावर अमित शहा यांनी म्हटले की, काँग्रेसने हा मुद्दा संयुक्त राष्ट्रात असल्याचे सांगितले आहे. संयुक्त राष्ट्राची परवानगी घेतल्याशिवाय आम्ही हे विधेयक घेऊन आलो आहोत. त्यामुळे काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी अमित शहा यांनी केली.