‘परिवेश रंगमंच’ची पर्यावरण दिनी नांदी

0
218

पिंपरी, दि.४ (पीसीबी) – थिएटर वर्कशॉप कंपनी आणि पैस रंगमंचच्या वतीने मुलांसाठी खास ‘परिवेश’ या नाविन्यपूर्ण संकल्पनेची सुरुवात पर्यावरणदिनी होत आहे. या अंतर्गत नाट्य या संकल्पनेबरोबरच निसर्गाशी मुलांचे नाते कसे जोडता येईल हा प्रयत्न असणार आहे असे संस्थेचे संस्थापक प्रभाकर पवार यांनी स्पष्ट केले.

ही नाविन्यपूर्ण संकल्पना थिएटर वर्कशॉप कंपनी या नाट्यसंस्थेची असून यामाध्यमातून निसर्गाशी जोडण्याचा हेतू असणार आहे. या माध्यमातून निसर्गातील पाने ,फुले , प्राणी, पक्षी या परिवेशातील या घटकांचे नाट्यमयरित्या अभ्यास करता येणार आहे. नव्या पिढीला निसर्गाशी नाळ आणखी घट्ट करुन कलाकार म्हणून आपल्या कलेला वाव देण्याची संधी मिळणार आहे. यासाठी परिवेश रंगमंचच्या कलाकारांनी एक तरी रोप लावून मग या उपक्रमाचा भाग व्हायचे आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून या उपक्रमाची नांदी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. लॉकडाऊन असेपर्यंत हा उपक्रम ऑनलाईन स्वरुपात सुरु राहणार असून अनलॉकनंतर प्रत्यक्ष कलाकारांच्या उपस्थितीत उपक्रम सुरु राहणार असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. थिएटर वर्कशॉप कंपनी ही गेली ११ वर्षे पिंपरी चिंचवड शहरात नाट्यचळवळीत कार्यरत असून संस्था विविध नाविन्यपूर्ण उपक्रम समाजासाठी घेत असते. या उपक्रमाचा भाग होण्यासाठी अधिक माहितीसाठी ८६६९२२०६१२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.