नोकरीचे आमिष अन ऑनलाईन टास्कच्या नादात महिलेची 13 लाखांची फसवणूक

0
195

पिंपरी, दि.१९ (पीसीबी) – वेगवेगळ्या लिंक त्यावर दाखवली जाणारी आमिषे , त्यावरून रिकामी होणारे बँक अकाऊंट अशी एक तरी तक्रार दिवसाला पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे दाखल होता आहे. यात नागरिकांना लाखोंचा गंडा घालण्यात येत आहे. चिखलीतील एका महिलेलाही नोकरीचे आमिष दाखवत लिंक पाठवली त्यात वेगवेगळे टास्क सांगत महिलेच्या खात्यावरून 9 लाख व टास्कची रक्कम असा एकूण 13 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. हा प्रकार 3 एप्रिल ते 5 एप्रिल 2023 या कालावधीत घडला आहे.

याप्रकरणी महिलेने गुरुवारी (दि.18) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी प्राकाश, दास, तीन महिला आरोपी व विविध बँक खातेधारक अशा 13 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना नोकरीचे आमिष दाखवून आरोपींनी विविध लिंक त्यांना पाठवून त्या खोलण्यास सांगितल्या. लिक ओपन केली त्यात टास्क दिले जायचे त्यानुसार टास्क करत असताना आरोपींनी टास्क द्वारे महिलेकडून 9 लाख 75 हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले. तसेच फिर्यादी यांच्या नफ्याची रक्कम परत न देता त्यांनी एकूण 13 लाख 45 हजार 500 रुपयांची फसवणूक केली आहे. यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून नागरिकांनी अशा भूलथापांना बळू पडू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सर्वात धक्कादायक म्हणते उच्च शिक्षीत तरुण- तरुणी देखील अशा स्कॅमला बळी पडत आहेत.