नितेश राणेंचा काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा  

0
383

मुंबई, दि. १ (पीसीबी) काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा  विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आज (सोमवार) दिला आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नितेश राणे आणि निलेश राणे या आपल्या दोन मुलांसह भाजपा प्रवेशाची तयारी सुरु केली आहे. मात्र त्यांच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त अद्याप लागलेला नाही. त्यामुळे तूर्तास तरी त्यांचे काय होणार हा प्रश्न आहेच. त्यातच आता नितेश राणे यांनी त्यांच्या काँग्रेस आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

बुधवारी (दि.२ )  नारायण राणे भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. तसेच नितेश राणेही भाजपात जाणार हे स्वतः नारायण राणेंनीच सांगितले आहे. नितेश राणे यांचा कणकवली देवगड मतदारसंघ भाजपकडे  आहे. नितेश राणे भाजपच्या तिकिटावर लढण्याची शक्यता आहे.