विधानसभेसाठी मनसेची २७ उमेदवारांची यादी जाहीर

0
499

मुंबई, दि. १ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार यादी आज (सोमवार) जाहीर केली आहे. पहिल्या यादीत २७ जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना माहिममधून तर ठाण्यातून अविनाश जाधव यांना उमेदवारी देण्यात आली   आहे.

धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र धर्मा पाटील यांना सिंदखेडामधून उमेदवारी दिली आहे. तर प्रमोद पाटील यांना कल्याण ग्रामीणमधून, प्रकाश भोईर यांना कल्याण पश्चिममधून, माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांना माहीममधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच मनसेच्या विद्यार्थी संघटनेचे नेते गजानन काळे यांना बेलापूरमधून तिकीट दिले आहे. कसबा पेठेतून मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे, हडपसरमधून पुणे महापालिकेतील मनसेचे गटनेते वसंत मोरे, कोथरूडमधून अॅड. किशोर शिंदे आणि शिवाजीनगरमधून सुहास निम्हण यांना तिकीट देण्यात आले आहे.