मानवाधिकार संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार

0
435

पिंपरी, दि.१ (पीसीबी) – मानवाधिकार संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकारी  यांचा स्वागत सोहळा आणि पुणे जिल्हा कार्यकारिणी नामफलक व कार्यालयाचा उदघाटन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.

यावेळी पुणे जिल्हा  अध्यक्ष सुभाष कोठारी, जनसंपर्क अधिकारी लक्षमण दवणे,  पुणे जिल्हा व सर्व पुणे जिल्हा पदाधिकारी व तालुका पातळीवर सर्व पदाधिकारी  उपस्थित होते.

संघटनेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष  खंडूदेव कठारे व राष्ट्रीय उपाध्यक्ष  प्रमोद केसरकर, सचिव नागेश भाले, खजिनदार रामराव नवघन, कार्याध्यक्ष एम.डी.चौधरी, महामंत्री डॉ. जावेद शिकलगार, निरीक्षक  रामदास खोत, कायदे सल्लागार अनिलकुमार जाधव,  नवनिर्वाचित पदाधिकारी याची संघटनेमध्ये निवड झाल्याबद्द्ल सत्कार करण्यात आला.