नितीन गडकरींच्या खेळीमुळे गोव्यात काँग्रेस सत्तेपासून दूर

0
617

पणजी, दि. २१ (पीसीबी) – भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी  केलेल्या खेळीमुळे काँग्रेसला गोव्यात सत्ता स्थापन करण्यात अपयश आले. गडकरी यांनी छोटया पक्षांबरोबर  यशस्वी वाटाघाटी करत भाजपसोबत येण्यास भाग पडले. त्यामुळे  काँग्रेसला पुन्हा एकदा सत्ता स्थापनेपासून वंचित राहावे लागले.

२०१७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या आहेत. मात्र, कमी जागा जिंकूनही  भाजपाने  सत्तेची चावी आपल्या हातात ठेवण्यात यश मिळवले आहे. महाराष्ट्र गोमंतक पक्ष या पक्षाला आपल्या सोबत घेत भाजपने काँग्रेसचे सत्ता स्थापन करण्याचे मनसुबे उधळून लावले.

आम्हाला अन्य छोटे पक्ष आणि अपक्षांची मदत लागणार होती. नव्या सरकारचे खातेवाटप निश्चित झाले असून हे सरकार चांगली कामे पुढे सुरु ठेवेल, असा विश्वास गडकरींनी यावेळी व्यक्त केला. काँग्रेसकडे १४ आमदार आहेत. मात्र, राज्यपालांकडे फक्त ३ आमदार गेले. बहुमत सिद्ध करण्यासाठी आम्ही आम्हाला पाठींबा देणाऱ्या सर्व आमदारांची नावे सादर केली, असेही गडकरींनी यावेळी सांगितले.