कासारवाडीत तरुणावर कोयत्याने वार

0
553

कासारवाडी, दि. २१ (पीसीबी) – झोपलेल्या इसमाच्या खिशातून पैसे काडत असताना हटकल्याच्या रागातून एकावर कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना बुधवारी (दि.२०) दुपारी साडेतीनच्या सुमारास कासारवाडीतील महाराष्ट्र बँकेसमोर घडली.