निगडी गावठाण येथील वयोवृध्द महिलेचे फळांचे दुकान जळाले; ५० हजाराचे नुकसान

0
729

निगडी, दि. १५ (पीसीबी) – निगडी गावठाण येथील जय बजरंग तरुण मंडळाच्या शेजारी असलेल्या एका वयोवृध्द महिलेच्या फळाच्या दुकानाला आज (सोमवारी) पहाटे पाचच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत फळाच्या दुकानासह त्यातील फळे जळून खाक झाली असून एकूण ५० हजारांचे नुकसान झाले आहे.