दि.०२(पीसीबी)-देशातील महिला शक्तीचा अपमान आणि काँग्रेस आघाडी सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने भव्य ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. दीपस्तंभ चौक ते गाय वासरू चौक दरम्यान निघालेल्या या मोर्चाचा समारोप मोहन नगर येथील दत्त मंदिर चौक येथे जाहीर सभेने झाला. यावेळी आंदोलक महिलांनी राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारून आपला तीव्र संताप व्यक्त केला.
या आंदोलनाचे नेतृत्व भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे आणि महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे यांनी केले. यावेळी आमदार उमा खापरे आणि आमदार अमित गोरखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
केंद्र सरकारने आणलेल्या ‘नारी शक्ती वंदन विधेयका’चे स्वागत करत असतानाच, विरोधकांकडून महिलांच्या बाबतीत होणाऱ्या भूमिकेचा मान्यवरांनी आपल्या भाषणातून कडाडून निषेध केला. “महिलांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस आघाडी सरकारचा धिक्कार असो” अशा घोषणांनी यावेळी परिसर दणाणून गेला होता.
या आंदोलनामध्ये संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, भाजपा गटनेता प्रशांत शितोळे, आरपीआय गटनेते कुणाल वाव्हळकर, नगरसेवक राहुल कलाटे, सुरेश भोईर, राजू दुर्गे, नवनाथ जगताप, अमित बाबर यांच्यासह माजी उपमहापौर शर्मिला बाबर, सरचिटणीस मधुकर बच्चे,नगरसेविका स्नेहा रंजित कलाटे, आरती चोंधे, रेश्मा चेतन भुजबळ, श्रुती राम वाकडकर, पल्लवी जगताप, अर्चना सस्ते, पल्लवी वाल्हेकर, शालिनी गुजर, शैलजा मोरे, सोनाली गव्हाणे, कविता भोंगळे आणि मनिषा पवार या महिला लोकप्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच महिला मोर्चाच्या पदाधिकारी अनघा रुद्र, ऐश्वर्या बाबर, मीनल यादव, रोहिणी मांढरे, रेश्मा सालेकर, दिपाली कलापुरे, कविता हिंगे, स्वाती जाधव, जोस्ना कलाटे, संजना यादव, स्वाती देशमुख, स्वाती पवार, नीतू भालेराव, नीता कुशारे आणि शोभा डोळस यांसह सर्वसामान्य महिला नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला निषेध नोंदवला.
नारी शक्तीचा अपमान करणाऱ्यांना समाज कधीही माफ करणार नाही आणि केंद्र सरकारच्या महिला हिताच्या निर्णयांना विरोध करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.












































