नराधम ‘लव्ह-जिहाद्यां’ना रोखण्यासाठी राज्यात कठोर कायदा करा ! नराधम ‘लव्ह जिहादींना फासावर लटकवा !

0
243

– चिंचवड येथील आंदोलनात रणरागिणींची मागणी

चिंचवड, दि. १८ (पीसीबी) – मुंबईतील हिंदू तरुणी ‘श्रद्धा वालकर’ हीचे 35 तुकडे करून तिची निर्घृणपणे हत्या करणारा नराधम लव्हजिहादी आफताब पुनावालाच्या विरोधात देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. हे प्रकरण ताजे असतांना उत्तर प्रदेशातील लखनौ येथेही 19 वर्षीय ‘निधी’ या हिंदू तरुणीने धर्मांतर करण्यास नकार दिल्यामुळे सूफियान या मुसलमान युवकाने तिला चौथ्या मजल्यावरून फेकून तिची निर्दयीपणे हत्या केल्याची दुसरी घटना समोर आली आहे. या केवळ एक दोन घटना नसून अनेक उदाहरणे यापूर्वीही समोर आलेली आहेत. जिच्यावर प्रेम करतो, त्या व्यक्तीची अशी निघृण हत्या कोणी करणार नाही. त्यामुळे या वासनांध आणि नराधम ‘लव्ह जिहादी’ आफताब पुनावाला आणि सूफीयान यांना तात्काळ फासावर लटकवावे, तसेच हिंदू मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर असा ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ करण्यात यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीची महिला शाखा ‘रणरागिणी’च्या वतीने चिंचवड येथील चापेकर चौकात घेण्यात आलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात आली.

या आंदोलनात विविध समविचारी हिंदु संघटना यांसह २०० हून अधिक रणरागिणी आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. या वेळी ‘आता अबला नको तू सबला हो, चंडी, दुर्गा, काली हो !’, ‘लव्ह जिहादी नराधम आफताबला फाशी द्या !’, ‘लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करा !’ अशा घोषणाही देण्यात आल्या. हिंदु मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मपरिवर्तन करणे, त्यांच्याशी ‘निकाह’ करणे, याला नकार दिल्यास बलात्कार करणे, ब्लॅकमेल करणे, हत्या करणे आदी गंभीर प्रकारांची हजारो प्रकरणे यापूर्वी उघड झाली आहेत. आपल्या मुली-बाळींना पळवण्यासाठी हे नराधम आपल्या घरापर्यंत पोहोचले आहेत.आपल्या पोटच्या पोरीचे 35 तुकडे पुन्हा होऊ देणार आहात का? त्यामुळे ‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करण्यात यावा, यासाठी आम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची लवकरच भेट घेणार असल्याचेही रणरागिणीच्या कु. क्रांती पेटकर यांनी या वेळी सांगितले. राज्यात युवती आणि महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण पहाता यावर काही टिप्पणी करणार कि नाही ? असा आमचा प्रश्न आहे. बेपत्ता होण्यामागे काही षड्यंत्र नाही ना, या मागे ‘लव्ह जिहाद’चा प्रकार तर नाही ना, याचीही गृहखात्याने चौकशी करावी,अशी आम्ही मागणी करत आहोत, असेही कु. क्रांती पेटकर यांनी या वेळी सांगितले.

विश्व हिंदु परिषद दुर्गा वाहिनीच्या चिंचवड जिल्हा संयोजिका कु. हर्षदा धुमाळ म्हणाल्या की, ‘लव्ह जिहाद’ गेल्या १३ सहस्र वर्षांपासून घडत आहे. अल्लाउद्दीन खिलजी नावाचा इस्लामी शासक भारतात येतो, भारतातील माता भगिनींची अब्रू लुटतो, भर चौकात त्यांचा लिलाव मांडतो ! मुलींनो, वेळीच सावध व्हा, मुलींनो, वेळीच सावध व्हा, हिंदू समाजाला लागलेली ‘लव्ह जिहाद’ची वाळवी हा समाज पोखरण्यापासून रोखण्यासाठी एक व्हा !

आंदोलनात चापेकर स्मारक समितीच्या व्यवस्थापक सौ. अर्चना दाभोळकर, समितीचे अतुल आडे, भाजपचे गोविंद जाधवर, हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माजी महापौर मंगला कदम, माजी महापौर अपर्णा डोके, पुणे ग्रामीण विभागाचे बजरंगदल संयोजक कुणाल साठे, धर्मप्रसार प्रमुख राम साळुंखे, गोरक्षक निलेश चासकर यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.