दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे जुलैमध्ये भूमिपूजन

0
391

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक लवकरच साकारणार आहे.  येत्या जुलै महिन्यात बाळासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन  केले जाणार आहे. स्मारकाची  निविदा प्रक्रिया एमएमआरडीए महिनाभरातच पुर्ण करणार आहे.  यानंतर जुलै महिन्यात भूमीपूजनानंतर प्रत्यक्ष स्मारकाच्या कामाला सुरवात होणार आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक झाली. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव अजाँय मेहता,  मुंबई महापालिका  आयुक्त प्रवीण परदेशी आणि एमएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त सोनिया सेठी उपस्थित होत्या. गेली पाच वर्षे विविध कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन अखेरीस आता शिवसेनाप्रमुखांचे राष्ट्रीय स्मारक  साकारणार  आहे.

मुंबईतील महापौर बंगल्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हे अंडरग्राऊंड स्मारक बांधले जाणार आहे. हेरिटेज समितीने अंडरग्राऊंड स्मारकाच्या प्रस्तावाला यापूर्वीच मंजुरी दिली आहे. दादरमध्ये असलेल्या महापौर बंगल्याच्या आवारात अनेक जुनी झाडे आहेत. ही झाडे न तोडता बंगल्याखाली स्मारक उभारण्यात येणार आहे.