‘दादा मी प्रेग्नेंट आहे’; पुण्यातील होर्डींगमुळे चर्चेला उधाण

0
3108

पुणे, दि. १ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमध्ये रस्त्यावर लावण्यात आलेल्या ‘शिवडे आय अॅम सॉरी’ होर्डिंगबाबत काही दिवसांपूर्वी  बरीच चर्चा  रंगली होती. आताही असेच एका होर्डींगमुळे  मुंबई-पुण्यात चर्चा रंगू लागली आहे. मुंबई-पुण्यात झळकलेल्या एका होर्डींगमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये दादरमधील ‘दादा मी प्रेग्नेंट आहे’ या नावाचे होर्डिंग चांगले चर्चेत आले आहे. तर पुण्यातील कर्वेरोडच्या डेक्कन टी पॉईंट येथेही असेच होर्डिंग्ज  दिसून आले आहे.  त्यामुळे नागरिकांमध्ये याबाबत मोठी उत्सुकता दिसून येत आहे.

हे होर्डिंग एखाद्या नाटकाचे किंवा चित्रपटाच्या प्रमोशनचे असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या होर्डिंगमागील उद्देश स्पष्ट होत  नाही, त्यामुळे नागरिकांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. काही दिवसापूर्वी रणवीर सिंगचे देखील ‘कार्ड मिला क्या’ नावाने होर्डिंग झळकले होते. त्याचीही मोठी चर्चा झाली होती. ते एक व्यावसायिक होर्डिंग असल्याचे नंतर समोर आले होते.