दहीहंडीची वर्गणी कमी दिल्याने दहा जणांच्या टोळक्याने दुकान मालकाच्या परिवारास केली मारहाण

0
324

 पिंपरी दि. ११ (पीसीबी) – रहाटणी येथे दहीहंडीची वर्गणी कमी दिल्याने दहा जणांच्या टोळक्याने दुकान मालकाच्या परिवारास मारहाण केली व दुकानाची तोडफोड केली. मंगळवारी (दि.9) ही घटना घडली.

याबाबत राहुल गुप्ता, (वय 27, रा. जय भवानी चौक, रहाटणी लिंक रोड रहाटणी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. प्रसाद राऊत, (वय 25), मनीष उर्फ मन्या कदम (वय 18), माऊली उपल्ले (वय 21), यश रसाळ (वय 20) यांना अटक करण्यात आली आहे.

रोहित शिंदे उर्फ बॉंड, सुनील शेट्टी, विजय तलवारे व त्यांच्यासोबत इतर तीन ते चार जण हे देखील आरोपी आहेत. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी (दि.9) रात्री आठच्या सुमारास सर्व आरोपींनी राज स्नॅक्स अँड स्वीट सेंटर येथे जाऊन फिर्यादीचे भाऊ विवेक यांच्याकडून दहीहंडीची वर्गणी मागितली व हातातील वर्गणीची पुस्तक विवेक यांच्याकडे दिले.विवेक यांनी त्यांना शंभर रुपये दिले मात्र त्यांनी विवेकच्या कानाखाली मारून 500 रुपयांची मागणी केली.त्यावेळी विवेकाने दोनशे रुपये देऊ केले सुनील शेट्टी व विजय तलवारे यांना त्याचा राग आल्याने त्यांनी विवेक यास हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी फिर्यादी त्यांना समजावून सांगत असताना विजय तलवारे, सुनील शेट्टी, माऊली उपल्ले, यश रसाळ, रोहीत शिंदे उर्फ बॉण्ड, मनेश उर्फ मन्या कदम, प्रसाद राऊत व त्यांच्या सोबतचे 3 ते 4 लोक दुकानामध्ये घुसले सर्वांनी मिळून त्यांचा भाऊ विवेक व पवन यांना हाताने मारहाण केली.

तसेच दुकानामधील स्नॅक्स काउंटर खाली पाडले व त्याच्या काचा फोडून सुनील शेट्टी व विजय तलवारे यांनी फिर्यादी व त्यांच्या भाऊ यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.