‘तुला माहीत नाही का, मी भोसरीचा भाई आहे’ असे म्हणत डॉक्टरला लुटले

0
430

भोसरी, दि. ३० (पीसीबी) ‘तुला माहीत नाही का, मी भोसरीचा भाई आहे’, असे म्हणत कोयत्याचा धाक दाखवून एका डॉक्टरला लुटले. ही घटना भोसरी येथे बुधवारी (दि. 29) रात्री घडली. सुदर्शन उर्फ पिल्या संभाजी राक्षे (वय 26), गोविंद कोळी (दोघे रा. शास्त्री चौक, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सुदर्शन राक्षे याला अटक केली आहे. याप्रकरणी डॉ. पुरुषोत्तम कारभारी राणे (वय 41, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी गुरुवारी (दि. 30) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुरुषोत्तम राणे हे डॉक्‍टर आहेत. बुधवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास ते त्यांच्या पुरुषोत्तम क्लिनिक येथे असताना दोन्ही आरोपी फिर्यादीच्या क्लिनिक जवळ आले. त्यांनी डॉक्टर राणे यांना कोयत्याचा धाक दाखवत शिवीगाळ केली. ‘तुला माहीत नाही का, मी भोसरीचा आहे. तू आत्ताच्या आत्ता तुझ्याकडे आहे तेवढे पैसे मला दे’, असे म्हणून डॉक्टर राणे यांच्या पॅन्टच्या मागच्या खिशातील पैशाचे पाकीट काढून घेतले. त्यातील बाराशे रुपये, आधार कार्ड जबरदस्तीने काढून घेतले. तसेच आरडाओरडा करत दहशत निर्माण करून सार्वजनिक ठिकाणी अशांतता निर्माण केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.