तुर्कीत ७.८ रिस्टर स्केलचा भूकंप

0
202

अंकारा, दि. ६ (पीसीबी) : तुर्कीत आज जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.8 एवढी होती. स्थानिक वेळेनुसार आज पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्र बिंदू जमिनीच्या आत 17.9 किलोमीटर होता. या धक्क्यामुळे तुर्कीत पत्त्याच्या बंगल्यासारख्या इमारती कोसळल्या. तर वाहनांवर इमारती आणि खांब कोसळल्याने वाहनांचा चक्काचूर झाला आहे. या भूकंपात शेकडो लोक दगावल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हानी आणि जीवितहानी याविषयी कोणतेही अधिकृत माहिती मिळालेलनी नसली तरी, सोशल मीडियावरील पोस्ट्स आणि व्हिडिओंमध्ये कोसळलेल्या इमारीत दिसून येत आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची शक्यता आहे.

भूकंपाचे धक्के सीरियापर्यंत जाणवले. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, तुर्कस्तान आणि सीरियामध्ये अनेक इमारतींचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची शक्यता आहे.