तळेगावमध्ये सव्वापाच लाखांची घरफोडी

0
415

तळेगाव, दि. ९ (पीसीबी) – बंद घराच्या खिडकीचे गज कापुन घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी बेडरुम मधील कपाट ठेवलेली ४ लाखांची रोख आणि १ लाख २५ हजारांचे ४० ग्रॅम वजनी सोन्याचे दागिने असा एकूण ५ लाख २५ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना मंगळवार (दि.७) सायंकाळी सहा ते रात्री साडेअकराच्या सुमारास परंदवाडी पो. बेबेडोळ ता. मावळ येथे घडली.

याप्रकरणी राजु शिवराम पापळ (वय ५०, रा. परंदवाडी पो. बेबेडोळ ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात बुधवार (दि.८) रोजी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजु पापळ यांचे बेबेडोळ येथे घर आहे. मंगळवारी सायंकाळी सहा ते रात्री साडेअकराच्या दरम्यान राजु हे त्यांच्या घराला कुलुप लावून कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे गज कापुन आत प्रवेश केला. तसेच बेडरुम मधील कपाट ठेवलेली ४ लाखांची रोख आणि १ लाख २५ हजारांचे ४० ग्रॅम वजनी सोन्याचे दागिने असा एकूण ५ लाख २५ हजारांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक सपकाळ चोरट्यांचा शोध घेत आहेत.