डोक्यात दगड घालून कचरा वेचकाचा खून

0
392

चाकण, दि. ४ (पीसीबी) – डोक्यात दगड घालून अज्ञातांनी कचरा वेचकाचा खून केला. ही घटना शनिवारी (दि. 3) दुपारी अडीच वाजता पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे भाजी मार्केटच्या शेडमध्ये घडली. रामदास राजाराम घुंबरे (वय 48, रा. भाजी मार्केट, पत्रा शेड, चाकण. मूळ रा. राहू, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी नाणेकरवाडीचे पोलीस पाटील राजू शांताराम नाणेकर (वय 46, रा. नाणेकरवाडी चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रामदास घुंबरे चाकण परिसरात कचरा वेचण्याचे काम करत होते. कचरा गोळा करून त्याच्या विक्रीतून येणाऱ्या पैशांवर त्यांची गुजराण सुरू होती. चाकण भाजी मार्केटमधील पत्र्याच्या शेडमध्ये तर कधी परिसरात इतरत्र ठिकाणी ते वास्तव्यास होते.

शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास रामदास यांच्या डोक्यात अज्ञातांनी दगड घालून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच चाकण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही. चाकण पोलीस तपास करीत आहेत.