पादचारी व्यक्तीचा लॅपटॉप व मोबाईल फोन हिसकावला

0
455

निगडी, दि. ४ (पीसीबी) – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या व्यक्तीचा तीन जणांनी मिळून लॅपटॉप आणि मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना शनिवारी (दि. 3) रात्री साडेसात वाजता ट्रान्सपोर्ट नगर, निगडी येथे घडली.

प्रदीपकुमार रतनलाल गोयल (वय 45, रा. सेक्टर 35, सोनीपथ, हरियाणा) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रान्सपोर्ट नगर, निगडी येथील पीएमपीएमएल बस डेपोसमोरून फिर्यादी प्रदीपकुमार रस्त्याने पायी चालत जात होते. त्यावेळी मोपेड दुचाकीवरून तीन अनोळखी चोरटे आले. त्यांनी प्रदीपकुमार यांचा 20 हजारांचा लॅपटॉप आणि 11 हजारांचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.