डॉ. हेमंत तापकीर यांच्यातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाच लाखांची मदत

0
724

पिंपरी दि. १९ (पीसीबी) – महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. हेमंत तापकीर यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाच लाखांची आर्थिक मदत देण्यात आली.

शुक्रवारी तापकीर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पाच लाखांचा धनादेश सुपुर्त केला. त्यावेळी विजय कुमार स्वामी, सचिन घाटपांडे, राजदीप तापकीर आदी उपस्थित होते. दरम्यान, याबाबत तापकीर यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्वीट करून आभार मानले आहेत.