परळीकरांचे पाणी पंकजा मुंडेनीच पळवले – धनंजय मुंडे

0
415

परळी, दि, १९ (पीसीबी) – परळीच्या भाजपा आमदारांनी स्वतःच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला वाण धरणातुन अमर्यादित पाणी घेतल्यामुळेच परळी शहराला पाण्याची टंचाई भासत असून पाण्याअभावी परळीकरांच्या होणाऱ्या हालअपेष्टांना त्याच जबाबदारी आहेत असा आरोप विधानपरिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

स्वतःच्या वैद्यनाथ कारखान्याला परळीचे पाणी घेतले मात्र शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे दिले नाहीत आणि परळीकरांचे पाणीही पळवले असा आरोप करून नगरपालिकेच्या टँकरने पाणीपुरवठा वाटप करण्यापेक्षा पालकमंत्री आणि या भागाच्या आमदार म्हणून परळीतल्या जनतेला पाणी देण्यासाठी त्यांनी काय केले असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

वान धरण कोरडे पडले असतानाही नगरपालिका ८० टॅंकरने पाणीपुरवठा करत आहे आपण स्वतः नाथ प्रतिष्ठान च्या वतीने पंधरा लाख रुपये नगरपालिकेला दिले नाथ प्रतिष्ठान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक स्वखर्चाने पाणीपुरवठा करत आहेत याचा आपल्याला अभिमान वाटतो असेही मुंडे म्हणाले.