डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका

0
635

पुणे, दि. १४ (पीसीबी) – ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन्ही आरोपींना आज (शुक्रवार) पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

संशयीत आरोपी अमोल काळे, राजेश बंगेरा आणि अमित दिगवेकर यांच्या विरोधात सीबीआयने ९० दिवसात आरोपपत्र दाखल न केल्याने पुणे न्यायालयाने या तिघांना जामीन मंजूर केला आहे. तीन आरोपींना एकाच वेळी जामीन मिळाल्याने गुन्ह्याच्या तपासावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सीबीआयचे तपास अधिकारी दिल्लीतील कामांमध्ये व्यस्त आहेत त्यामुळे आम्हाला २० डिसेंबरपर्यंत वाढीव मुदत द्यावी अशी मागणी सीबीआयकडून न्यायालयात करण्यात आली होती. मात्र पुणे सत्र न्यायालयाने सीबीआयची ही मागणी फेटाळून लावत संशयीत तिघा आरोपींना  जामिन मंजूर केला आहे.