राजस्थानात गेहलोत मुख्यमंत्री; पायलट उपमुख्यमंत्री

0
537

जयपूर, दि. १४ (पीसीबी) – मध्य प्रदेशनंतर राजस्थानमधील मुख्यमंत्रिपदा तिढाही सुटला असून अशोक गेहलोत हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत तर सचिन पायलट यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या दोन्ही नावांवर शिक्कामोर्तब केले. याबाबत काँग्रेसच्या दिल्ली मुख्यलयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात आली.