डॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार?; शिरूर मतदारसंघात लढण्याची शक्यता

0
855

मुंबई, दि. १ (पीसीबी) – छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेमुळे गाजलेले अभिनेते आणि शिवसेने उपनेते डॉ. अमोल कोल्हे शिवसेनेचे शिवबंधन सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधण्याची चिन्हे आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हे आज (शुक्रवारी) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते.

कोल्हे यांना २०१४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे मिळालेल्या लोकप्रियतेचा फायदा घेत शिवसेनेने त्यांच्या हाती शिवबंधन बांधले होते. आता ते संभाजी महाराज यांच्या भूमिकेमुळे यशोशिखरावर आहेत. शिवसेनेने त्यांना उपनेतेपद दिले.

मात्र कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पावर यांची भेट घेतली आणि तर्कवितर्कांना उधाण आले. कोल्हे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर शिरुर मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.