डांगे चौकात दुचाकी भाड्याने हवी असल्याचे सांगून चोरली

0
745

चिंचवड, दि. २३ (पीसीबी) – दोन दिवसांसाठी दुचाकी भाड्याने हवी असल्याचे सांगून एका दुकानदाराची दुचाकी चोरट्याने पळवून नेली. ही घटना सोमवार (दि.२१) दुपारी अडीचच्या सुमारास डांगे चौकातील पंडीत पेट्रोलपंपाजवळ घडली.

याप्रकरणी श्राम अभीषेक सिंग चौहान (वय ३२, रा. व्यवसाय बी/१३०३४३, प्रिवेट डाईट मिटकॉनजवळ, बालेवाडी, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अजय माणिक वाझरकर (रा. से.नं.२८, टेल्को कामगार सोसा. प्लॉट नं.डी १, बीजलीनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी आरोपी अजय वाझरकर हा श्राम सिंग याच्या दुकानात गेला. त्याने त्यांची २५ हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र.एमएच/१२/क्युजे/८७४८) दोन दिवसांसाठी भाड्याने नेली. मात्र ती परत न करता दुचाकी घेऊन फरार झाला. वाकड पोलीस तपास करत आहेत.