डंपरच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू; डंपर चालकाला अटक

0
173

हिंजवडी, दि. १७ (पीसीबी) – रस्ताने पायी जात असलेल्या एका व्यक्तीला भरधाव वेगात आलेल्या एका डंपरने धडक दिली. त्यामध्ये पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात ५ डिसेंबर रोजी रात्री पावणे नऊ वाजता पंचरत्न चौक, हिंजवडी येथे घडला.

रणजित मोतीलाल ठाकूर (वय ३४, रा. भोईरवाडी, हिंजवडी) असे अटक केलेल्या डंपर चालकाचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई शिवराम बाळासाहेब भोपे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयत व्यक्तीची ओळख पटली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ठाकूर याने त्याच्या ताब्यातील डंपर (एम एच १४ / एच जी ५४४४) भरधाव वेगात चालवून अंदाजे ५२ वर्ष वयाच्या पादचारी व्यक्तीला धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. याबाबत बुधवारी (दि. १६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.