‘या’ कारणांमुळेच आजही धीरूभाई अंबानींना व्यवसाय दुनियेतील ‘शहेनशाह’ म्हंटल जात…!

0
319

देशातील सर्वांत मोठी कंपनी म्हणून रिलायन्स इंडस्ट्रीज ओळखली जाते. तिची स्थापना करणारे व तिला यशाच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जाणारे धीरजलाल हिराचंद अंबानी उर्फ धीरूभाई अंबानी यांना सगळेच ओळखतात. पण हे यश मिळवणं सोप्प नव्हतं..

२८ डिसेंबर १९३२ ला गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यातील छोट्याशा गावात चोरवडा मध्ये धीरुबाई अंबानी यांचा जन्म झाला होता. धीरुभाई यांचा यशस्वितेचा प्रवास अत्यंत प्रेरणादाई आहे. लहानपणी त्यांनी सामोसे सुद्धा विकले होते. त्यांनी यमनमध्ये ३०० रुपये पगारावर पेट्रोल पंपावर काम केले होते. जेव्हा त्यांचे मित्र आणि भाऊ अभ्यास करत असत, तेव्हा धीरुभाई अंबानी पैसे कसे कमवायचे याचा मार्ग शोधायचे.

यमनमधून भारतात येताना त्यांच्या खिश्यात फक्त ५०० रु. होते. त्यांनी रिलायन्स टेक्स्टाइल ची १९६६ मध्ये स्थापना केली. निव्वळ १५ हजार रुपयापासून रिलायन्स कमर्शियल कोर्पोरेशन सुरु करणारे धीरुभाई अंबानी होते.
धीरूभाईंचे व्यवसायचा खरा विस्तार केला तो त्यांच्या दोन मुलांनी. मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांनी. लहानपणापासून धीरुभाई यांना अनेक कठीण परिस्थितीचा तोंड द्यावं लागलं होत. त्यांच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले आणि मग त्यांनी छोटी मोठी काम सुरु केली. फळे आणि नाष्टा विकणे हि त्यांच्या कामाची पहिली सुरुवात… मात्र या कामात काहीच फायदा होत नसल्याने ते काम बंद करून सामोसे विकण्यास सुरवात केली. परंतु हे काम सुद्धा जेव्हा चालले नाही तेव्हा ते भावाकडे यमनला पुन्हा गेले.त्यांचे भाऊ यमन मध्ये नोकरीला होते. तिथे धीरुभाई यांना एका पेट्रोल पंपावर काम मिळाले. त्याचा तेव्हा महिन्याचा पगार फक्त ३०० रुपये होता. मात्र धीरूभाई अंबानी नेहमीच आपल्या व्यवसाय सुरु करण्याच्या विचार करायचे. यमन मध्ये ते ज्या कंपनीत कामाला होते तिथे कॅन्टीनमध्ये २५ पैस्याला चहा होता परंतु, ते दुसऱ्या महागड्या हॉटेलमध्ये चहा पिण्यास जात असत, जिथे त्यांना चहासाठी एक रुपया द्यावा लागत असे. जेव्हा त्यांना विचारल गेल कि असे का करता,तेव्हा त्यांनी उत्तर दिले कि , त्या हॉटेल मध्ये मोठे व्यापारी चहा पिण्यासाठी येतात आणि त्यांच्या व्यवसायाबद्दल चर्चा करतात ज्यामुळे मला त्यांच्या व्यवसायाच्या बऱ्याच गोष्टी ज्ञात होतात. कि, व्यवसाय कसा करायचा आणि वाढवायचा..

नंतर धीरूभाई जेव्हा बर्मा शैल कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर बनून भारतात आले तेव्हा त्यांचा पगार ११०० रुपये महिना झाला होता. यमनमध्ये असतानाते ते १० रुपये खर्च करण्याअगोदर १० वेळा विचार करायचे परंतु शैल कंपनीत काहीवेळा एक टेलिग्राम पाठवण्यासाठी ते ५ हजार रुपये सुद्धा खर्च करायचे. कारण त्यांना माहिती होते कि, कुठे पैसे खर्च केल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा होईल आणि कुठे तोटा.नंतर त्यांनी शैल कंपनी सोडली आणि रिलायन्स कमर्शियल कोर्पोरेशनची १५ हजार रुपयामध्ये स्थापना केली. त्यावेळी कंपनी मसाले आणि कॉटन यार्न चा व्यवसाय करत असे. विश्वास बसणार नाही पण धीरुभाई यांनी मातीसुद्धा विकली होती. त्यामुळे धीरूभाई अंबानी स्वतःला शून्य पातळीवरचा व्यावसाईक समजत असत. म्हणजेच त्यांच्याकडे कोणताही व्यावसाईक वारसा नव्हता. तरीसुद्धा त्यांनी शून्यातून आपलं विश्व निर्माण केले. त्यांनी त्यांचा व्यवसाय स्वतःच्या हिमतीवर वाढवला. धीरूभाई यांच वेगळेपण हे आहे कि, ते नेहमी ध्येय मोठे ठेवायचे. ते भारतातील पहिले असे व्यावसाईक आहेत ज्यांनी कोटा परमीत आणि लायसन्स राजमध्ये सुद्धा आपले काम चांगल्या पद्धतीने पूर्ण केले. जिथे टाटा ,बिर्ला , बजाज सारख्या बड्या औद्योगिक कंपन्या लायसन्स समोर गुडघे टेकत होत्या तेथे धीरूभाई वेगळ्या पद्धतीने आपले काम काढून घेत होते. आणि हीच त्यांची खासियत होती. आणि यशाची गुरुकिल्ली सुद्धा.

व्यवसायामध्ये त्यांना खूप स्पर्धा आणि प्रतिस्पर्धीनचा सामना करावा लागला. तरी फक्त फायद्याकडे लक्ष न देता त्यांनी गुणवत्तेकडे जास्त लक्ष ठेवलं. व्यवसायामध्ये जोखीम हि उचलावीच लागते हे त्यांना माहिती होते. त्यांनी हळू-हळू धाग्यांच्या व्यवसायावर त्यांनी आपला जम बसवला. आपल्या अभ्यासाच्या आणि अनुभवाच्या जोरावर ते मुंबई व्यापारी संघटनेचे संचालक झाले. पुढे त्यांनी अहमदाबादच्या नरोडा मध्ये कापड गिरणीची स्थापना केली आणि विमल ब्रांडला देशाचा गाजलेला ब्रांड बनवले. रिलाइन्स इंडस्ट्रीज मध्ये २०१२ पर्यंत सुमारे ८५००० कर्मचारी काम करत होते. भारत सरकारला मिळणाऱ्या करामधील ५ टक्के कर हा फक्त रिलाइन्स भरत असे. २०१२ मध्ये मालमत्तेच्या हिसाबाने सर्वात मोठी श्रीमंत कंपन्यांमध्ये धीरूभाई अंबानी यांची कंपनी पण सामील झाली होती. धीरूभाई हे आशियातील टाॅप ५० व्यापाऱ्यांच्या यादीमध्ये सुद्धा सामील झाले. शिवाय फोर्ब्सच्या यादीमध्ये स्थान मिळवणारी रिलाइन्स हि भारताची पहिली वाहिली कंपनी ठरली.

धीरूभाइंनी आपल्या अतूट कष्ट आणि विश्वासाने कंपनी उभी केली. त्यांचं ६ जुलै २००२ साली हृदयविकाराने निधन झाले जेव्हा ते गेले त्यावेळी त्यांची एकूण संपती तब्बल ७५ हजार करोड पेक्षाही जास्त होती. त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाने म्हणजेच मुकेश अंबानी यांनी कंपनीला यशाच्या उत्तुंग शिखरावर नेलं. रिलाइन्स हि भारतातील सर्वात मोठी कंपनी असून कंपनीचे मार्केट कॅपिटल जवळ्जवळ १५० अरब पर्यंत पोहचले आहे. मुकेश अंबानी हे जगातील १० वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.जगातील अनेक मोठ मोठ्या कंपन्यांनी रिलाइन्स च्या जिओ मध्ये गुंतवणूक केली आहे. रिलाइन्स हि आजही पूर्ण कर्जमुक्त कंपनी आहे. फक्त ५०० रु पासून सुरु झालेली कंपनी आज अरबो रुपयांची उलाढाल करतेय. त्यामुळे यामागे किती कष्ट, विश्वास, श्रद्धा आहे याचा अंदाज आपण लावू शकतोय. धीरूभाई अंबानी आणि त्यांच्या कंपनीचा हा प्रवास सर्वांसाठीच एक नवी प्रेरणा देणारा आहे…