ठेकेदाराच्या भोंगळ्या कारभारामुळे दहा वर्षाच्या मुलाचा अपघात; आयुक्त राजेश पाटलांनी ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल – युनुस पठाण

0
290

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) : प्रभाग क्रमांक 23 धनगर बाबा मंदिर च्या मागे संत ज्ञानेश्वर कॉलनी या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत काम चालू आहे थेरगाव हॉस्पिटल च्या शेजारी महानगरपालिकेच्या लग्नाचा हॉल त्याच्या मागं महानगरपालिकेच्या भोंगळ्या कारभारामुळे व यांच्या आशीर्वादामुळे ठेकेदाराच्या भोंगळा कारभारामुळे एका दहा वर्षाच्या मुलाचा अपघात झालं आहे त्याला पाच टाके पडले आहे. त्याच्यामुळे महानगरपालिकेने ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावा व लायसन जप्त करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सफाई कामगार सेल प्रदेश सचिव युनुसभाऊ पठाण यांनी मागणी केली आहे.

लवकरच लवकर महानगरपालिकेने जातीने लक्ष ठेवून त्या ठिकाणी चे रस्त्याचे काम व त्या परिसरात मधले होणारे कामाचं पाहणी करून लवकरच लवकर काम पूर्ण करण्यात यावा अशी विनंती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सफाई कामगार सेल प्रदेश सचिव युनूस पठाण यांनी पत्र देऊन मागणी केली आहे लवकरात लवकर काम करण्यात नाय आलं तर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सफाई कामगार सेल प्रदेश सचिव युनूस पठाण यांनी काम पूर्ण करण्यास नाही आले तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील याला दिलं आहे.