पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी अर्बन सेलच्या पदाधिकाऱ्यांची खासदार वंदना चव्हाण यांनी घेतली आढावा बैठक

0
303

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) : नुकतीच शहर राष्ट्रवादी मध्ये अर्बन सेलची स्थापन झाली आहे. त्यामार्फत सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता “ओके” या उपक्रमाअंतर्गत सुरु केली आहे. तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र सार्वजनिक स्वच्छतागृह हा मुद्दासुद्धा अर्बन सेलने उचलला आहे. पालिकेच्या विविध योजनांचा फायदा जनतेला मिळवून देण्यासाठी अर्बन सेल पुढे येत आहे. तसेच युवकांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य निरोगी राहावे यासाठी ” तीन तास बिनधास्त ” हा उपक्रम राबवण्यात येत आहे. राष्ट्रवादी अर्बन सेलच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनी पिंपरी चिंचवड अर्बन सेलच्या आढावा बैठकीत हे उपक्रम जाणून घेतले. यावेळी त्या म्हणाल्या की आपण अर्बन सेल अंतर्गत केलेल्या कामाचा फायदा आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी पक्षाला तसेच वैयक्तिक स्वतःला होऊ शकतो. यावेळी त्यांनी सेलच्या प्रत्येकाकडून कामाचा लेखाजोखा जाणून घेतला.

सदर झूम मीटिंगला महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नितीन जाधव ,राष्ट्रवादी अर्बन सेलच्या समन्वयक ‘शहर सुधार व महापालिका’ समितीचे समीर थोपटे, राहुल बाळापुरे- उप समन्वयक,अशोक मगर- निरीक्षक तर‘पर्यावरण, शहर सुशोभीकरण व पर्यटन विकास’ समितीचे निलेश पुजारी,निरीक्षक जॉन डिसोझा ‘महिला व बाल कल्याण’ समिती स्नेहा शिंदे-उप समन्वयक ,‘युवक – युवती’ समिती विलास वाघमारे-उप समन्वयक,निरीक्षक ऍड.सचिन औटे, ‘आरोग्य सेवा’ समिती,निरीक्षक गंगाताई संजय धेंडे,आदित्य संजय धुमाळ -समन्वयक तर अभिजित आल्हाट समन्वयक ‘शिक्षण सांस्कृतिक सेवा’ समिती, किरण देशमुख-निरीक्षक,व्यापारी समितीचे निरीक्षक अक्षय फुगे तर ‘स्वयंसेवी संस्था’ समिती समन्वयक वंदना पेडणेकर आणि अरुणा कुंभार तर ‘प्रशिक्षण’ समितीच्या समन्वयक कविता खराडे आणि उपसमन्वयक जान्हवी पंदारे आढावा बैठकीस उपस्तिथ होत्या.

राष्ट्रवादी अर्बन सेलचे शहर अध्यक्ष माधव पाटील यांनी सर्वांचे आभार मानले आणि अर्बन सेलचे सर्व पदाधिकारी मिळून या शहरासाठी आणि जनतेसाठी जोमाने काम करू असे वंदना चव्हाण यांना सांगितले.