टीपी रद्द मागणीसाठी सोमवारी चऱ्होली ग्रामस्थांचा महामोर्चा

0
20

– बैलगाडे, ट्रॅक्टरसह सर्व महिला, जेष्ठांचा सहभाग असणार
चऱ्होली, दि. ५ – चऱ्होली परिसरातील १४२५ हेक्टर क्षेत्रावरच्या पाचही टीपी स्किम रद्द करण्याचा लेखी आदेश होत नाही तोवर गप्प बसायचे नाही असा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. याच विषयावर पुढचे पाऊल म्हणून येत्या समोवारी म्हणजे ९ जून रोजी सकाळी वाजता आपापले बैलगाडे, ट्रॅक्टर, शेतीची अवजारे घेऊन महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यासाठी महामोर्चाचे आयोजन केले आहे. बुधवारी रात्री गावच्या विठ्ठ मंदिरात झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला.
कुदळवाडी येथे ३८० हेक्टरची आणि संपूर्ण चऱ्होलीत १४२५ हेक्टच्या पाच टीपी योजना करण्याचा इरादा महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी जाहीर केला होता. कुदळवाडी अतिक्रमण कारवाईचा खरा हेतू टीपी स्किम होता, असा आरोप झाल्याने ती टीपी स्किम रद्द करणे प्रशासनाला भाग पडले. चऱ्होली संपूर्ण गाव टीपी मध्ये आल्याने या ग्रामस्थांनीसुध्दा उठाव केला आणि निर्णय मागे घेण्याची मागणी केली. आयुक्त शेखर सिंह यांच्या बरोबर दोन वेळा बैठका झाल्या. आयुक्त टीपी स्किमसाठी विशेष आग्रही राहिले. आमदार महेश लांडगे यांनी गावकऱ्यांच्या बाजुने भूमिका घेतली. अखेर तूर्तास टीपी स्किम स्थगित करण्याचा निर्णय आयुक्त सिंह यांनी जाहीर केली. प्रत्यक्षात जोवर टीपी रद्द होत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवणार असे जाहीर केले. गेल्या सोमवारी याबद्दल महापालिका सभेत निर्णय कऱण्याचे आश्वासन मिळाले होते पण आयुक्त आपली फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्यावर गावकरी संतापले. आता शेवटचा एकच हातडा म्हणून महामोर्चाचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

सोमवारी ९ जून रोजी चऱ्होली येथील वेताळबुवा चौकात सकाळी ९ वाजता सर्व ग्रामस्थ जमतील आणि तेथून मोर्चाची सुरवात होईल. सुरवातीला वाघेश्वर महाराजांना अभिषेक घालण्यात येईल.
सकाळी बरोबर १० वाजता मोर्चा चऱ्होली फाटा- मार्गे तापकीर चौक वडमुखवाडी – जय गणेश साम्राज्य चौक – भोसरी नाशिक फाटा – मार्गे बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे सर्वांनी आपापल्या गाड्या पार्क करून – पिंपरी चिंचवड महानगरपालिका दालनावर धडकणार आहे.