जुमलेबाजीमुळेच राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला; उध्दव ठाकरेंचा भाजपला टोला  

0
601

शिर्डी,  दि. २१ (पीसीबी) – गेल्या ३० वर्षांपासून मी राम मंदिराविषयी ऐकत आहे. निवडणूक जवळ आली की त्यांना राम मंदिराचा मुद्दा आठवतो. मात्र, मंदिर कधी बांधणार ? असा सवाल करतानाच ‘जुमलेबाजी चालत आहे, त्यामुळेच राम मंदिरांचा मुद्दा हाती घेतला’, असा टोला  शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपला लगावला. 

शिर्डीत आज (रविवार) शिवसेनेचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी  उद्धव ठाकरे बोलत होते.

पंतप्रधान मोदी यांचे नाव न घेता ते म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी येथे काही लोक साईबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. २०१९ मध्ये आम्हालाच सत्ता देण्याचे साकडे त्यांनी साईबाबांना घातले. पाच वर्ष मिळालेल्या सत्तेतून गरीबांसाठी तुम्ही काय केले? असा सवाल साईबाबांनी त्यांना विचारला असेल ना?,’ असा टोला त्यांनी मोदींना लगावला. हे लोक खोटे बोलून सत्तेवर आले आहेत आणि सध्या त्यांचा कारभार खोटे बोलून रेटून नेला जात आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली.