छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आज बहुजन समाज्याला जास्त आहे – ऍड लष्मण रानवडे

0
404

संत तुकाराम नगर,दि.२२(पीसीबी) – आज बहुजन समाजातील लोकांनी शिवाजी महाराजांचे खरे विचार वाचले पाहिजे आणि समजून घेतले पाहिजे जेणे करून त्याचा प्रसार आणि प्रचार केला जाईल शिवाजी महाराज यांनी बारा बलुतेदार आणि अठरा पगड जाती यांना एकत्र करून कुठल्याही प्रकारचा जातीभेद न मानता स्वराज्य निर्माण केले . पंचशील संघ संत तुकाराम नगर येथील बुद्ध विहारात आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती निमित्त मराठा सेवा संघचे अध्यक्ष ऍड लष्मण रानवडे बोलत होते.

अध्यक्ष स्थानी पंचशिल संघाचे विजय गायकवाड होते. ते म्हणाले शिवाजी महाराज एक उत्तम संघटक होते त्यांना माणसाची पारख होती तानाजी मालुसरे, कोंडाजी,यसाजी,बाजीप्रभू देशपांडे, मदारी मेहतर,काजी हेदर,नूरय्या बेग,हिरोजी फर्जंद,सिद्दी हिलाल असे विश्वासू लोक महाराजांसोबत होते म्हणून स्वराज्य निर्माण झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव रमेश झेंडे यांनी केले व आभार प्रदर्शन विशाल कांबळे यांनी केले.