चोराचा साथीदार कसे झालात?; छगन भुजबळांचा उध्दव ठाकरेंना खोचक सवाल

0
689

नाशिक, दि. १९ (पीसीबी) – पहारेकरी चोर आहे. मग चोराचा साथीदार कसे काय झालात ?, असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना केला आहे. 

भुजबळ नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप-शिवसेनेच्या युतीवर निशाणा साधला.

ते पुढे म्हणाले  की, आधी स्वबळाची घोषणा करायची, भाजपच्या विरोधात बोलायचे. शिवसेना ही डबल ढोलकीसारखी काम करत आहे. सरकारमध्ये बसून सरकारवरच टीका करायची आणि विरोधी पक्षाची जागाही लाटायची, अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली.