नवज्योत सिद्धू तुमच्या मित्राला समजवा; दिग्विजय सिंहांचा उपरोधिक सल्ला

0
976

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यावरून पंजाबमधील काँग्रेसचे मंत्री नवज्योत सिद्धूला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना समजावण्याचा उपरोधिक सल्ला दिला आहे. 

दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत  म्हटले आहे की, तुमचा मित्र इम्रान खानमुळे तुम्हाला जनतेच्या शिव्या खाव्या लागत आहेत. काश्मीरचा प्रश्न ७१ वर्षे जुना आहे आणि आपण सर्वच त्यासाठी जबाबदार आहोत. सर्व पक्षांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवावा, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

इम्रान खान यांनी धाडस दाखवावे आणि हाफिज सईद व मसूद अजहर यांना भारताच्या ताब्यात द्यावे. तसे केल्यास पाकिस्तान आर्थिक संकटातून बाहेर पडेल आणि तुम्हाला नोबेल शांतता पुरस्कारही मिळेल, असा उपाहासात्मक टोला दिग्विजय यांनी लगावला आहे.