मराठीतून ट्विट करत राहुल गांधींचे शिवाजी महाराजांना अभिवादन   

0
449

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले आहे. त्यांनी मराठीमधून ट्विट करून महाराजांना  वंदन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. सर्व समाजातील मावळे एकत्रित करून त्यांनी स्वराज्य उभारलं आणि जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्यांचे जीवन आणि राज्य कारभार जगासाठी अनुकरणीय आहे. या महान राजास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.