चित्रा वाघ यांना “मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर” ची लक्षणे, वेळीच तपासणी करा – रूपाली चाकणकर

0
219

मुंबई,दि.३०(पीसीबी) – स्वतःच्या पक्षाच्या आमदारांना गुन्हा पाठिशी घालणाऱ्यांना दर मिनिटाला खोटं बोलावं लागतंय, एकाच वेळी वेगवेगळी कारणं सांगावी लागतात…ही ‘मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरची’ चीच लक्षणं आहेत. हा आजार अतिशय भयानक असून चित्रा वाघ यांनी वेळीच तपासणी करून तब्येतीची काळजी घ्यावी, अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केली आहे.

भाजपचे आमदार सुनील कांबळे यांच्या ऑडियो क्लिप प्रकरणी चित्रा वाघ मौन बाळगून होत्या. तीच संधी साधत रूपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. रुपाली चाकणकर मुंबईत माध्यमांशी बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर भाजप आमदार सुनील कांबळे यांच्या वक्तव्यप्रकरणी निशाणा साधला आहे. मुंबईत एका कार्यक्रमानंतर त्या बोलत होत्या.

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, कोरोना हा आजार मानवनिर्मित असून तो भारतात आणला गेला असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. त्याचसोबत कोरोना काळात अमित शहा यांच्या मुलाचा नफा नऊ हजार पट वाढला होता, त्यासाठी अमित शहा यांच्याकडे कोणती जादूची कांडी आहे का? असा प्रश्न करत ती कांडी देशातील बेरोजगार तरुणांना द्यावी, ज्याचा देशातील बेरोजगारांनाही फायदा होईल असे ते म्हणाले.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उज्वला गॅस योजनेवरही त्यांनी जोरदार टीका करत महिलांनी मतदान करण्यासाठी जाताना घरातील गॅस बघून जावा असा टोमनाही पटोले यांनी लगावला आहे.