गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर बलात्कार

0
461

हिंजवडी, दि. ३० (पीसीबी) – खाण्यातून गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर बलात्कार केला. तसेच तिचे विवस्त्र फोटोही काढले. याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 26 एप्रिल 2020 ते 14 जून 2021 या कालावधीमध्ये फिर्यादी विवाहितेच्या घरी मारुंजी येथे घडली.

सौरभ संतोषकुमार श्रीवास्तव (वय 29, रा. गोरखपूर. पूर्ण पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने बुधवारी (दि. 29) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीवास्तव याने महिलेच्या घरी येऊन तिला खाण्यातून कोणते तरी गुंगीकारक पदार्थ खाण्यास दिले. फिर्यादी महिला शुद्धीवर नसताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच तिचे विवस्त्र अवस्थेतील फोटोही काढले. ते फोटो तुझ्या पतीला पाठवतो, असे धमकावून 26 एप्रिल 2020 ते 14 जून 2021 या कालावधीमध्ये फिर्यादीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. 29 ऑगस्ट 2021 रोजी फिर्यादी यांच्या अंगातील टी-शर्ट सार्वजनिक जागेत फाडला. तसेच फिर्यादी यांच्या बँक खात्यातून 44 हजार रुपये परस्पर स्वतःच्या अकाउंटला पाठवून त्या रकमेचा अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.