चिंचवडमध्ये भांडणाचा जाब विचारल्याच्या रागातून टोळक्यांकडून एकाला जबर मारहाण

0
453

चिंचवड, दि. २१ (पीसीबी) – भांडणाचा जाब विचारल्याच्या रागातून चार जणांच्या टोळक्यांनी एकाला बांबू आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करुन जखमी केले. ही घटना बुधवारी (दि.१९) रात्री आठच्या सुमारास चिंचवड वाल्हेकरवाडीतील मातृविद्यालयाच्या पाठीमागच्या बाजुस घडली.

निलेश ज्ञानेश्वर आहेर (वय ३५, रा. आहेरनगर बाल्हेकरवाडी रोड, चिंचवड) असे जखमी इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, स्वप्नील वाघमारे, किरण खवले, नाया आणि बंट्या या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री आठच्या सुमारास वाल्हेकरवाडीतील मातृविद्यालयाच्या पाठीमागच्या बाजूस आरोपी हे भांडण करत होते. यावेळी फिर्यादी निलेश याने स्वप्नील याला, “तू भांडण का करतोस तुला काय अडचण आहे”, असा जाब विचारला. यामुळे चौघे आरोपी स्वप्नीलवर चिडले आणि त्यांनी लाथाबुक्क्यांनी आणि बांबूने जबर मारहाण करुन त्याला जखमी केले. आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही. सहायक पोलीस निरीक्षक आर.टी.शेवाळे तपास करत आहेत.