चिंचवडमध्ये खुन्नसने बघितल्याने दोघांवर कोयत्याने वार

0
511

चिंचवड, दि. २३ (पीसीबी) – हॉटेलमध्ये जेवत असताना खुन्नसने बगील्याच्या कारणावरुन एकाने मित्राला बोलवून घेत दोघांवर कोयत्याने वार केले. ही घटना रविवारी (दि.२१) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चिंचवड गरवारे कंपनीजवळील हॉटेल शेतकरी मळा समोर घडली.

याप्रकरणी जखमी ज्ञानेश्वर मारुती कदम (वय २४, रा. सतीश नलावडे यांच्या खोलीत, संत तुकारामनगर, तळवडे) याने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बंटी काळभोर आणि त्याच्या एका अनोळखी साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी  सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जखमी ज्ञानेश्वर हा त्याच्या मित्रासोबत चिंचवड येथील हॉटेल शेतकरी मळामध्ये जेवण करण्यासाठी गेला होता. यावेळी तेथे असलेल्या आरोपी बंटी काळभोर याच्यासोबत ज्ञानेश्वर याची खुन्नसने बगीतल्याच्या कारणावरुन वाद झाला. यावर बंटीने त्याच्या एका साथीदाराला बोलवून घेतले. त्याने ज्ञानेश्वर याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या ज्ञानेश्वर याच्या मित्राच्या हाताच्या अंगठ्यावर कोयता मारुन जखमी केले. आरोपी सध्या फरार आहेत. निगडी पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.