चाकण येथे मुलाला मारल्याच्या रागातून महिलांकडून तरुणाला दगडाने मारहाण

0
557

चाकण, दि. १० (पीसीबी) – मुलाला मारल्याच्या रागातून तीन महिलांनी एका तरुणाला पकडून त्याच्या डोक्यात आणि तोंडावर दगड मारुन गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवार (दि.८) रात्री साडेअकराच्या सुमारास मौजे वाकी बुद्रुक हद्दीत घडली.

आकाश साहेबराव कड (वय २४, रा. वाकी बुद्रुक मंदीरा पाठीमागे, ता. खेड) असे दगडाचा मार लागून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, जुलेखा हमीद इनामदार (वय ४०), शेहनाज दाऊत काझी (वय ३१) आणि जैयतुबी हसीन काझी (वय ६५, रा. वाकी बुद्रुक ता. खेड, जि.पुणे) या तिघिंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आरोपी जुलेखा, शेहनाज आणि जैयतुबी या तिघी आकाश याच्याकडे गेल्या. आणि तुझ्या भावाने आमचा मुलगा जावेद इनामदार (वय २०) याला का मारले असा जाब विचारुन शिवीगाळ करत पकडले. तसेच जमिनिवर पडलेला दगड आकाश याच्या डोक्या आणि तोंडावर मारुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी तिघा महिला आरोपींना अटक केली आहे. सहायक पोलीस फौजदार वाघोले तपास करत आहेत.