गुजराथचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन

0
341

गांधीनगर, दि. २९ (पीसीबी) – गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे दिग्गज नेते केशुभाई पटेल यांचं आज गुरुवारी निधन झालं आहे. ते 92 वर्षांचे होते. केशुभाई यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. कोरोनावर मात केल्यानंतर त्यांची तब्ब्येत जास्त बिघडली होती.

आज सकाळी अचानक श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्यानंतर आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांनी उपाचाराला काहीही प्रतिसाद दिला नाही आणि रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली.