शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकाला अटक

0
447

नेगरुनगर, दि. २९ (पीसीबी) – लोखंडी कोयता आणि काठी बाळगल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि. 28) दुपारी सव्वापाच वाजता संतोषीमाता चौक, नेहरूनगर, पिंपरी येथे घडली.

मनोज उर्फ मन्या म्हसुकांत विटकर (वय 39, रा. कात्रज) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह गब-या उर्फ हर्षल रामदास पवार (रा. नेहरूनगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई गणेश खाडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज याने एक लोखंडी कोयता आणि गब-या याने काठी कुणालातरी मारण्याच्या उद्देशाने जवळ बाळगली. याबाबत दोघांवर भारतीय हत्यार कायदा कलम 4, 27 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मनोज याला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.