गर्दीच्या वेळी महिलांसाठी ‘या’ मार्गावर धावणार ‘महिला स्पेशल बस’

0
232

– पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मा. स्थायी समिती अध्यक्षा सिमा सावळे यांंच्यामुळे सुरू झालेली सेवा पुन्हा नव्याने येणार

पिंपरी,दि.०२(पीसीबी) –  पिंपरी-चिंचवड शहरात गर्दीच्या वेळी महिलांना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसमधून प्रवास करताना येणाऱ्या अडचणींचा विचार करता केवळ महिलांकरिता पिंपरी-चिंचवड “महिला स्पेशल बस” (तेजस्विनी) सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ महिलांसाठी धावणा-या या बसमध्ये महिला कंडक्‍टरची नेमणूक केली जाणार आहे. यापूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेत स्थायी समिती अध्यक्षा असताना जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांच्या पाठपुराव्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र बससेवा सुरू करण्यात आली होती. आता पुन्हा त्याच पध्दतीने नव्याने महिला स्पेशल बस सुरू होणार आहे.

पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य कणा पीएमपीएमएल आहे. पीएमपीएमएल बसेसमधून रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. यासाठी पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात पीएमपीएलच्या सुमारे दीड हजारपेक्षा अधिक बसेस संचलनामध्ये आहेत. दररोज या बसेसमध्ये मोठी गर्दी असते. विशेषतः सकाळी आठ ते बारा आणि रात्री चार ते आठ या “पीक अव्हर्समध्ये” हे गर्दीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात असते. त्यामुळे बसमधील महिला प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे गर्दीच्या वेळी महिलांसाठी तेजस्विनी बसेस सोडल्या जातात. मात्र, दुपारी बारा ते सायंकाळी पाच या मधल्या काळात या बसेसमधून पुरुषांना देखील प्रवास दिला जात होता. परंतु आता या बसेसमधून केवळ महिलांना प्रवास करता येणार आहे. तसेच, या सर्व मार्गांवरील बसेसमध्ये महिला कंडक्‍टरची नेमणूक केली जाणार आहे.

या मार्गांवर धावणार महिला स्पेशल बस
मनपा ते आकुर्डी, निगडी ते पुणे स्टेशन, भोसरी, हिंजवडी माण फेज तीन, चिंचवडगाव ते भोसरी, चिखली ते डांगे चौक या मार्गांवर बस धावणार आहेत.