“गरवारे टेक्निकल फायबर कामगार व कर्मचारी पतसंस्थेची सुवर्ण महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न..”

0
824

चिंचवड, दि. ३० (पीसीबी)- चिंचवड येथील ५१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्ष स्थानी मा. प्रबोध कामत यांची निवड करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून कंपनीचे चेअरमन माननीय वायुसाहेब गरवारे उपस्थित होते..

५० वर्षात सोसायटीने घेतलेली गरुड झेप,आजपर्यंत सोसायटीने केलेली प्रगती याबद्धल प्रबोध कामत यांनी आढावा घेतला, सोसायटीस ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्धल सर्व सभासदांना ५० ग्रॅम चांदीचे नाणे यावेळी भेट म्हणून देण्यात आले,व ११% लाभांश देण्यात आला. आजपर्यँत सोसायटीला ऑडिटमध्ये नेहमीच ‘अ, वर्ग मिळालेला आहे,असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

प्रमुख पाहुणे माननीय वायुसाहेब यांनी सोसायटीच्या कामकाजाचे व आजपर्यंतच्या प्रगतीचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना त्यांनी जग बदलते आहे स्पर्धा खूप आहे काळानुरूप आपल्याला पण बदलायला हवे स्पर्धेला समोर जायला हवे असे सांगितले..

कंपनीचे अध्यक्ष वायू गरवारे पुढे म्हणाले, आज औद्योगिक क्षेत्रात आर्थिक मंदीचे वातावरण आहे  जागतिक पातळीवरील स्पर्धेत टिकायचे असेल तर, उत्पादीत वस्तू निर्मितीच्या किंमतीवर व गुणवत्तेवर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. असे प्रतिपादन केले. पतसंस्थेला आज ५० वर्षे पूर्ण झाली ही कौतुकास्पदबाब आहे, आजपर्यंत करत आलेला पारदर्शी कारभार पुढील ५० वर्षे टिकून राहण्यासाठी एकसंघपणे कार्यरत राहण्याबाबत शुभेच्छा दिल्या.

या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित सर्वसाधारण वार्षिक सभेचे उदघाटन कंपनीचे अध्यक्ष वायू गरवारे यांच्याहस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यावर्षी झालेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेत ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू कंपनीचे अध्यक्ष वायू गरवारे व मान्यवरांचे हस्ते देवून सुमारे ४५ जणांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वरीष्ठ पदाधिकारी , संस्थेचे अध्यक्ष पी.एस. कामत,उपाध्यक्ष एस.ए. राणे, आर.एम. तेलंग, एस.एस. राजपाठक, रावेंद्र मिश्रा, मुकेश सुराणा, तज्ञ संचालक व्ही.बी.आरेकर आदि उपस्थित होते.

संस्थापक चेअरमन माननीय आर.एम. तेलंग यांनी मनोगत व्यक्त केले.त्यांनी लावलेले हे छोटेसे रोप आज एका वटवृक्षात रुपांतरीत झालेले पहाताना मला व माझ्या सर्व आजी माझी सहकाऱ्यांना मनापासून आनंद व समाधान होत असल्याचे सांगितले.

प्रगती अहवाल वाचन एस.एस.करमरकर यांनी केले. सूत्रसंचालन शाम कुंभार व डी.व्ही. कुलकर्णी केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक व्ही.व्ही. विधाते, एन.के. शर्मा, एस.एस. पाणबुडे, एस.के. कडू, पी बी जागडे, बी.डी. रिकामे, जी.एस. भोसले, ए.जी. महाडीक, एस.एस. काळे आदींनी परिश्रम घेतले.