पाचाणे येथील हॉटेलमधून विदेशी दारुसह सीसीटीव्ही डिव्हीआरची चोरी

0
244

मावळ, दि. २८ (पीसीबी) – मावळ तालुक्यातील पाचाणे येथील हॉटेल एल एन रेस्टोरंट आणि बार या हॉटेलमध्ये चार वाहनातून आलेल्या चोरट्यांनी चोरी केली. हॉटेलमधून विदेशी दारू आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर बॉक्स चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 25) रात्री साडेअकरा ते मंगळवारी (दि. 26) सकाळी सात वाजताच्या कालावधीत घडली.

प्रकाश शंकर येवले (वय 51, रा. पाचाणे मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मारुती सुझुकी अल्टो (एम एच 12 / सी वाय 4703), मारुती सुझुकी अल्टो (एम एच 14 / बी सी 6643), मारुती सुझुकी अल्टो (एम एच 14 / एफ एम 4529) हिरो स्प्लेंडर दुचाकी (एम एच 14 / जे क्यू 5198) या वाहनावरून आलेल्या चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मावळ तालुक्यातील पाचाणे येथे हॉटेल एल एन रेस्टोरंट आणि बार नावाचे हॉटेल आहे. फिर्यादी यांनी त्यांचे हॉटेल सोमवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास कुलूप लावून बंद केले. त्यानंतर आरोपी चोरटे हॉटेलच्या मागील बाजूला असलेल्या बेसिनच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून हॉटेलमध्ये आले. चोरट्यांनी हॉटेल मधून विदेशी दारू आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर असा एकूण एक लाख 31 हजार 128 रुपयांचा ऐवज चोरून नेला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.