खडकवासला येथील मेजर शशीधरन नायर शहीद

0
1350

पुणे, दि. १२ (पीसीबी) – खडकवासला येथील मेजर शशीधरन नायर यांना जम्मू- काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ वीरमरण आले. दहशतवाद्यांनी घडवलेल्या इम्प्रुवाइज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाइसच्या (आयईडी) स्फोटात ते शहीद झाले .   

राजौरी जिल्ह्यातील नौशेरा भागातील रूपमती आणि पुख्खरणी या ठिकाणी शुक्रवारी (दि. ११) संध्याकाळी दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेजवळील भूमिगत ठेवलेल्या आयईडीचा स्फोट झाला. या दोन स्फोटांमध्ये सैन्यातील  मेजर शशीधरन नायर हे शहीद झाले आहे. त्यांच्यासोबत एक जवानही शहीद झाला आहे.

शहीद झालेले मेजर शशीधरन नायर  यांची पत्नी तृप्ती नायर या खडकवासला येथे राहतात. मेजर शशीधरन हे ३३ वर्षांचे होते. ११ वर्षांपासून ते सैन्यात कार्यरत होते. मेजर नायर यांचे पार्थिव आज सकाळी ११ वाजता विमानाने पुण्यात  आणण्यात आले.