मावळ मतदारसंघात ३४ आदर्श मतदान केंद्र स्थापित करणार

0
72

मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने विधानसभा मतदारसंघनिहाय महिला, युवा तसेच संस्कृती जोपासणा-या मतदान केंद्रासह सुमारे ३४ आदर्श मतदान केंद्र स्थापित करण्यात येणार आहेत. आवश्यक सुविधांनी युक्त ही मतदान केंद्रे मतदारांच्या स्वागतासाठी आणि मतदानासाठी सज्ज करण्यात येणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वैशिष्ट्यपूर्ण आणि विशेष मतदान केंद्रे स्थापित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महिला संचलित मतदान केंद्रांवर सर्व महिला अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षेसाठी नियुक्त महिला पोलीस अशा सर्व महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. युवा संचलित मतदान केंद्रावर युवा वयोगटातील सर्व निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असेल तसेच आदर्श मतदान केंद्रावर मतदानाच्या अनुषंगाने सर्व सेवासुविधा तसेच आवश्यक त्या अतिरिक्त सुविधांसह संस्कृती दर्शवणारी रचना या केंद्राची केली जाते. त्यानुसार मावळ लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघ निहाय अशी केंद्रे स्थापित करण्यात येणार आहेत. यामध्ये १४ महिला संचलित मतदान केंद्र, १४ युवा संचलित मतदान केंद्र आणि ६ संस्कृती जोपासणारे आदर्श मतदान केंद्र असे एकूण ३४ मतदान केंद्र स्थापित केले जातील.

उरण विधानसभा मतदारसंघात ५ महिला संचलित मतदान केंद्र, ५ युवा संचलित मतदान केंद्र आणि १ संस्कृती जोपासणारे आदर्श मतदान केंद्र स्थापित करण्यात येतील. महिला संचलित मतदान केंद्र म्हणून नागरी संरक्षण गट कार्यालय बोरी प्रशिक्षण केंद्र, उर्दू नागरिक प्राथमिक शाळा उरण, उरण एज्युकेशन सोसायटीचे उरण इंग्लिश मिडीयम स्कूलमधील खोली, कोकण ज्ञानपीठ कॉलेज कार्यालयाजवळील खोली, सिटीझन हायस्कूलमधील खोली, तसेच युवा संचलित मतदान केंद्र म्हणून रायगड जिल्हा परिषद शाळेतील खोली, रायगड जिल्हा परिषद शाळा कराळ मधील खोली, रायगड जिल्हा परिषद शाळा दिघोडे येथील खोली, रायगड जिल्हा परिषद शाळेतील खोली, ग्रामपंचायत कार्यालय करंजादे तळमजला हॉल, तर मॉडेल (आदर्श ) मतदान केंद्र म्हणून रायगड जिल्हा परिषद शाळा खोपटे बांधपाडा नवीन इमारतीमधील खोली याप्रमाणे मतदान केंद्रे स्थापित केले जातील.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात महिला संचलित मतदान केंद्र, युवा संचलित मतदान केंद्र आणि संस्कृती जोपासणारे आदर्श मतदान केंद्र असे प्रत्येकी एक केंद्र स्थापित केले जाईल. महिला संचलित मतदान केंद्र म्हणून किवळे येथील पेंडसे कॉलनी विकासनगर मधील विद्याभूवन शाळेची खोली, युवा संचलित मतदान केंद्र म्हणून बाबूरावजी घोलप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील खोली आणि मॉडेल (आदर्श ) मतदान केंद्र म्हणून रावेत येथील सिटी प्राईड शाळेतील खोली याप्रमाणे मतदान स्थापित करण्यात येणार आहेत.

पनवेल विधानसभा मतदारसंघात १ महिला संचलित मतदान केंद्र, १ युवा संचलित मतदान केंद्र आणि १ संस्कृती जोपासणारे आदर्श मतदान केंद्र स्थापित करण्यात येईल. महिला संचलित मतदान केंद्र म्हणून के.ई. एस. आय. जे. चे वाजेकर इंग्लिश मिडीयम स्कूलमधील खोली तसेच युवा संचलित मतदान केंद्र म्हणून के.ई. एस. हायस्कूल पनवेल येथील खोली तर मॉडेल (आदर्श ) मतदान केंद्र म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या प्री गुजराती शाळेमध्ये मतदान केंद्रे स्थापित करण्यात येणार आहेत.

कर्जत विधानसभा मतदारसंघात ५ महिला संचलित मतदान केंद्र, ५ युवा संचलित मतदान केंद्र आणि १ संस्कृती जोपासणारे आदर्श मतदान केंद्र स्थापित करण्यात येतील. महिला संचलित मतदान केंद्र म्हणून रायगड जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेची खोली, जनता विद्यामंदिर प्राथमिक शाळा दहिवली येथील खोली, खोपोली नगरपरिषदेची बालवाडी शिलागणव येथील खोली, सह्याद्री विद्यालय शिलाफाटा येथील खोली, खोपोली येथील कॅरमेल कॉन्व्हेंट स्कूलमधील खोली तसेच युवा संचलित मतदान केंद्र म्हणून नेरळ येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची खोली, तिघर येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील खोली, अंजारून येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची खोली, खारवई येथील जिल्हा परिषद मराठी शाळेची खोली, खोपोली येथील जनता विद्यालयातील खोली तर मॉडेल (आदर्श ) मतदान केंद्र म्हणून अभिनव ज्ञानमंदिर प्राथमिक शाळेतील खोली याप्रमाणे मतदान केंद्रे स्थापित करण्यात येतील.